Ad will apear here
Next
लंडनच्या आजीबाई


‘बेळगाव, निपाणी, कारवार आणि लंडनसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झालाच पाहिजे अशी घोषणा आता द्यायला हरकत नाही,’ असे आचार्य अत्रे ह्यांनी एकदा गमतीने म्हटले होते.

त्यांनी लंडनसह म्हटले होते. कारण लंडनमधील आजीबाई वनारसे ह्यांच्या खानावळीत अनेक मराठी माणसे जेवायला यायची. ऑक्सफर्ड, केम्ब्रिजची मराठी मंडळी इथे जमायची. इंदिरा गांधी आजीबाईंच्या घरी आल्या आणि ‘self-made woman’ असे म्हणून कौतुक केले. स्वामी चिन्मयानंद, स्वामी प्रभुपाद, भीमसेन जोशी, हृदयनाथ मंगेशकर हे आजीबाईंच्या घरी यायचे आणि पु. ल. देशपांडेही लंडनला गेल्यावर आजीबाईंच्या खानावळीत जेवायला जात.

अशिक्षित असलेल्या आजीबाईंनी लंडनमध्ये चार इमारती विकत घेतल्या, लंडनमध्ये मंदिर बांधलं; पण हा प्रवास अत्यंत खडतर होता. राधा डहाके हे आजीबाईंचं नाव. विदर्भातील सावतेली समाजात त्यांचा जन्म झाला. पुढे दोनदा वैधव्य आलं. दारिद्र्याचे दशावतार अनुभवले. नशिबाने त्यांना लंडनमध्ये नेऊन सोडलं. 

लंडन हे गावाचं नाव आहे, की देशाचं हे त्यांना माहीत नव्हतं. ना लंडनची भाषा येत होती, ना तिथली संस्कृती माहीत होती. तरीही त्यांनी खानावळ कशी सुरू केली, लंडनच्या दुकानातून सामान कसे आणायच्या, दुकानदारांशी खाणाखुणा करून कशा बोलायच्या आणि त्यांनी लंडनमध्ये इमारत कशी विकत घेतली हा सगळा प्रवास वाचायचा, तर लेखिका सरोजिनी वैद्य ह्यांचे ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ हे पुस्तक वाचायला हवे आणि संग्रहीसुद्धा ठेवायला हवे.

दारिद्र्य, उपासमार, वैधव्य, मुलींची जबाबदारी, परकीय देश अशा अनेक अडचणी त्यांनी सहन केल्या आणि प्रचंड कष्टाच्या बळावर लंडनमध्ये मानाचे स्थान मिळवले. आपला धर्म, जीवनपद्धती, आपली माणसे जोडण्याची कला, देवावर अपार श्रद्धा ठेवणाऱ्या आजीबाई गेल्या तेव्हा लंडनच्या मेयरने श्रद्धांजली वाहिली होती.

आपला जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन सकारात्मक करायचा असेल, तर हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

- निरेन आपटे

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IVJICT
Similar Posts
रहस्यमय त्रिकोणाचा मागोवा अटलांटिक महासागराच्या पश्चिमेस असलेला हा सागरी प्रदेश अनेक वर्षांपासून एक गूढ बनून राहिला आहे. विजय देवधरांनी अनुवाद केलेल्या बर्म्युडा ट्रँगल पुस्तकात ह्या गूढ सागराचा वेध घेतला आहे. हा भाग सैतानाचा आहे इथपासून ते परग्रहावरील मानव इथून विमाने-जहाजे पळवतात इथपर्यंतच्या शक्यतांची माहिती दिली आहे. पुस्तकाचा
मानसिक आजार जाणून घेण्यासाठी... मनाचे असे कोणते आजार असू शकतात आणि त्यावर काय उपाय केले जातात, ह्यावर डॉक्टर श्रीकांत जोशी ह्यांनी लिहिलेलं ‘मनोविकारांचा मागोवा’ हे पुस्तक म्हणूनच संग्रही ठेवण्यासारखं आहे.
डबिंगच्या गमतीजमती आमची रिहर्सल चालली होती; पण अमिताभ ‘च’चा उच्चार हिंदी ‘च’सारखा करत होते. मग मी मराठी ‘च’ म्हणून दाखवत होतो आणि ते फॉलो करत होते. शेवटी अचानक थांबले आणि त्यांनी मला विचारलं, ‘‘लोणचं’वाला ‘च’ बोलना हैं क्या?’ मी स्तंभित झालो. त्यांना लोणचं शब्द माहीत होता!! मी होकार दिल्यावर त्यांनी मराठी ‘च’चा अचूक
शेवटचे स्टेशन कुडाळ!! आपण लोकल ट्रेनने प्रवास करतो तेव्हा अनेक स्टेशनांची अनाउन्समेंट ऐकू येते आणि शेवटी आपले स्टेशन येते. अनेक स्टेशन्स पालथी घातल्यावर आपले मुक्कामी स्टेशन येते. इथे विसावा असतो. कल्याण सोडून असा विसावा कुडाळमध्ये घ्यावा असे मला वारंवार वाटत आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language